जळगावमहाराष्ट्र

एरंडोल शहरातील जय गुरू व्यायामशाळा नं. १ यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य कुस्त्या संपन्न

प्रतिनिधी एरंडोल  येथे जय गुरु व्यायाम शाळा नंबर १ च्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. सदर कुस्तीचे शुभारंभ आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
              शिवजयंती निमित्त जय गुरु व्यायाम शाळा न.१ एकतर्फे शनी मंदिर समोर सकाळी १० वाजेपासून तर संध्याकाळी ५.० वाजेपर्यंत भव्य कुस्त्यां आयोजित करण्यात आल्या होत्या .यावेळी तालुक्याचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते कुस्त्यांचे जोड लावून शुभारंभ करण्यात आले. यावेळी या कुस्ती स्पर्धांचा शुभारंभ करत कुस्ती प्रेमींसाठी तालुक्याचा ठिकाणीच स्पर्धांचे आयोजन करून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले. यावेळी जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक मनोज पाटील यांनी प्रस्तावित केले

प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकग्राम गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख बबलु चौधरी, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे मा.नगरसेवक रूपेश माळी, अतुल महाजन, आशिर्वाद पहेलवान यांचेसह कुस्ती स्पर्धक, कुस्ती प्रेमी, आयोजक व आदी मान्यवर उपस्थित होते.         यशस्वीतेसाठी बाळा पैलवान ,बाबाजी पाटील ,अमोल तांबोळी, श्याम जाधव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button