
प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील गालापुर येथे मंजुर विकासकामांचा भुमीपुजन व लोकार्पण सोहळा व आमदारपदी निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते
आ .अमोल पाटील यांचे आगमन होताच जोरदार फटाक्यांच आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर मंजूर कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा पार पडला या त आमदार अमोल चिमणराव पाटील यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत सत्कार करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले मतदारसंघाचा सर्वांगिण विकास, शाश्वत विकास यासह लोक कल्याणासाठी आवश्यक ते व्हिजन हे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळापासुनच तयार होते. म्हणुन या विकासाचे व्हिजन घेवुन जनतेसमोर गेल्याने जनतेने देखील भरभरून आशिर्वाद दिला.गालापुरची ग्रामपंचायत ही अतिशय नयनरम्य आहे. या निसर्गरम्य वातावरणात काम करत असतांना देखील ऊर्जा प्राप्त होते. लोकहित, लोककल्याण हेच ध्येय डोळ्या समोर ठेवत येत्या काळात उर्वरीत विकासकामांचा अनुशेष पुर्ण करणार आहे.गेल्या विधानसभेत चुकीचा अपप्रचाराने मला विधानसभेत जरी कमी मत पडली असतील, तरी गावाचा सर्वांगिण विकास खुंटु देणार नसल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थ मंडळींना आश्वासित केले.यासमयी गालापुर येथील विनोद महाजन यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.तसेच गालापुर येथील घरकुल “ड” यादीतील पात्र लाभार्थ्यांना जागेचे वाटप करण्यात आले.
जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुकाप्रमुख रवि जाधव, मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील, तालुकाप्रमुख कमलेश पाटील, शहरसंघटक मयुर महाजन, निपाणे मा.सरपंच संजय पाटील, ताडे मा.सरपंच शांताराम पाटील, ताडे मा.सरपंच सचिन पाटील, विश्वास पाटील, पिंप्री मा.सरपंच महेंद्र पाटील, आनंदनगर येथील देशमुख राठोड, गणेशनगर गोविंदा राठोड, रवि जोगी, प्रमोद राठोड, बाम्हणे येथील मुकुंदा पाटील, मा.सरपंंच आरिफ, गालापुर उपसरपंच अर्जुन मोरे, सचिन महाजन, अंतुर्ली येथील गणेश पाटील यांचेसह पंचक्रोशितील गावांच्या ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी, पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक आर. एम .पवार यांनी केले तर आभार माजी सरपंच आरिफ शेख यांनी केले