जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल महाविद्यालय व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक महिला दिनानिमित्त  कार्यशाळेच्या आयोजन .

प्रतिनिधी एरंडोल:- येथे जागतिक महिला दिनानिमित्त दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व  नगरपरिषद  यांच्या संयुक्त विद्यमानाने ०८ मार्च २०२५ रोजी शहरातील महिला बचत गटांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अमित पाटील हे होते.  सेंट्रल बँक शाखा एरंडोल चे व्यवस्थापक भरत जाधव यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
           भरत जाधव यांनी महिला बचत गटांसाठी व वैयक्तिक महिलांसाठी सरकार व बँक यांच्याकडून मिळणाऱ्या सुविधा व योजना यांची सखोल माहिती उपस्थित महिलांना दिली.  अमित पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  महिला या कुटुंबाचा व समाजाचा कणा असतात.  महिला  सशक्त,  समर्थ,  निरोगी आणि महत्त्वाचे म्हणजे आत्मनिर्भर असल्या पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
एडवोकेट  दीपक पाटील यांनी महिलांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या विविध कायदे व कलमांची उपस्थित महिलांना माहिती दिली. एडवोकेट श्रीमती प्रतिभा पाटील यांनीही कार्यशाळेतील महिलांना महिलांवर होणारे अत्याचार व महिलांसाठी असणारे संरक्षणात्मक कायदे याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.    
                एरंडोल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल वानखेडे यांनी उपस्थित महिलांना त्वचारोग,  त्याची कारणे,  उपाययोजना तसेच आपल्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे याबद्दल उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.  सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री महेंद्र पाटील यांनी  आपल्या मनोगतातून बचत गटाच्या  महिलांना आर्थिक नियोजनातून  होणारे फायदे  स्पष्ट केले  तसेच महिला बचत गटांसाठी सरकारच्या विविध योजना व सवलती यांची माहिती उपस्थित महिला बचत गट सदस्यांना दिली.
         उपस्थित ४०० महिलांना अल्पोहार व भेटवस्तू अमितदादा फाउंडेशन कडून देण्यात आले.
           महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील,  उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर,  माजी प्रभारी प्राचार्य एन. ए. पाटील, बचत गट समुदाय संघटक सौ.कुसुम पाटील,  कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  आर एस पाटील,  विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सोपान साळुंखे इ.
यांची प्रमुख उपस्थिती होती.
           कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. स्वाती शेलार यांनी केले. सूत्रसंचालन युवती सभा मंचच्या सचिव डॉ. रेखा साळुंखे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सविता पाटील यांनी केले.
         कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी  डॉ. शर्मिला गाडगे, रुपाली पाटील, हेमलता अहिरराव,  मीना सोनवणे, राजश्री पाटील, मनीषा बाविस्कर,  पल्लवी पाटील,  जयश्री देशमुख,  सपना पाटील,  निकिता रायगडे,  माधुरी मराठे, मंजुश्री राजपूत, कविता पाटील, देवयानी साळुंखे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेत उपस्थित महिलांना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button