शालेय विद्यार्थ्यांच्या अपार आयडी साठी शिक्षकांची कसरत,…
पालक वर्गामध्ये आधार कार्ड मागितल्यावर संभ्रम शंका….
प्रतिनिधी एरंडोल:- शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड . ( ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री ) तयार करण्याचा उपक्रम सध्या स्थितीत सुरू आहे. हा उपक्रम राज्यातील सर्वच शाळांना बंधनकारक आहे. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तपशील व सर्व माहिती एका क्लिकवर मिळवता येईल. हा आयडी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल आयडी म्हणून वापरला जाईल. हा सरकारचा ‘वन नेशन वन स्टूडेंट आयडी ‘ या कार्यक्रमाचा एक भाग आहे. असे बोलले जाते.
या उपक्रमांमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या नोंदी घेता येऊ शकतात. विद्यार्थी गळती होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. डुप्लिकेट विद्यार्थी कमी होऊ शकतात. असे अधिकारी वर्गातून सांगितले जाते.
* अपार आयडी मस्त, शिक्षक त्रस्त ….
अपार आयडी तयार करण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड , असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स शाळेत आल्यानंतर ज्यावेळी आपारा आयडी करण्याचे काम ऑनलाइन सुरू होते. त्यावेळी बरेचसे आधार कार्ड मिस मॅच होतात, काही आधार कार्डवर स्पेलिंग मिस्टेक असतात, आधार कार्ड अपडेट नसतात, काही पालकांच्या आधार कार्डवर कुळ असते तर मुलाच्या आधार कार्डवर जातीचा उल्लेख असतो (सोनवणे-पाटील) यामुळे ऑनलाइन प्रणालीमध्ये अपार आयडी करण्याची प्रक्रिया थांबते. अपार आयडीचा फार्मर्स पूर्ण होत नाही. ऑनलाइन प्रक्रिया असल्यामुळे बऱ्याच वेळा सर्वर जाम असते. अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असे शिक्षक वर्गातून बोलले जाते.
* पालक वर्गात संभ्रम, गोंधळ अवस्था
शाळेत आधार कार्ड मागितल्यावर पालक वर्ग संभ्रमात येतो. विद्यार्थ्यांचा अपार आयडी हा पालकांचे आधार कार्ड वापरून बनविला जातो. आधार कार्ड मुळे सर्व माहिती सहज दिसू शकते, पालकांचे आधार कार्ड अपडेट नसले तर त्यांना तो शंभर किंवा दोनशे रुपयाचा भुदंड बसतो व त्याला वेळ देखील लागू शकतो. अशा एक ना अनेक अडचणी पालक वर्गातून बोलल्या जात आहेत.
दरम्यान सदर प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांचा डेटा पालकांचा डेटा ऑनलाइन पद्धतीने एकत्रित होतो परंतु हा डेटा सुरक्षित आहे की नाही. दिवसान दिवस ऑनलाइन मुळे होणारी फसगत लक्षात घेता या गोष्टींचा विचार व्हावा असे जानकरांचे मत आहे.