धारागीर जि. प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

एरंडोल – तालूक्यातील धारागीर येथील जि. प. प्राथमिक शाळेते नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी इ. १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास सरपंच वैशाली पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश पाटील, पोलीस पाटील दिलीप पाटील यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी देखील शिक्षकांचा सत्कार केला. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी विविध पारंपारिक लोकनृत्य, देशभक्तीपर गीत, नाटिका कार्यक्रमातून सादर करण्यात आल्या.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजश्री सपकाळे, प्रीती दुबे, मंगला सोनवणे, अर्चना पाटील, मनीषा पाटील आदींनी परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहनपर रक्कम दात्यांनी बक्षीस म्हणून दिले. तसेच सरपंच वैशाली पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वाटप केले. कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. आज आमच्या धारागीर गावात जणू एका मोठ्या उत्सवाचेच आयोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.