महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त तयारी करीत असताना युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू.

प्रतिनिधी – एरंडोल येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ दि. १० एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास महात्मा फुले जयंती साजरी करण्यासाठी तयारी करीत असताना मंडपाला अचानक आग लागल्याने आग विझवण्याचा प्रयत्न करीत असताना विजेच्या खांबाचा धक्का लागल्याने तरुण पंकज गोरख महाजन याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनवरून मिळालेली माहिती अशी की एरंडोल येथे ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ तयारी सुरू होती.यावेळी त्याठिकाणी असलेल्या मंडपाला अचानक आग लागली सदर आग विझवण्यासाठी पंकज गोरख महाजन ( ३२ ) हा तरुण गेला असता त्यास मंडपाच्या जवळ असलेल्या विजेचा खांब्याचा धक्का लागल्याने त्यास त्याचा चुलत भाऊ विजय महाजन याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विलास पाटील हे करीत आहेत.