पियुषा काबरे , डॉ . गितांजली ठाकूर नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित…..

एरंडोल:- येथील पियुषा प्रसाद काबरे (बालाजी ग्रुप) यांना नारी शक्ती पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच डॉ.गितांजली ठाकूर यांनी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देण्यात आला.
सुर्या फाऊंडेशन तर्फे आयोजित खान्देश करिअर महोत्सवात आलेल्या प्रमुख अतिथी व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी आपल्या भाषणात पालक व मुलांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे. मुलांना काय व्हायचे आहे ते जाणून घेतले पाहिजे. गरिबांच्या हुशार मुलांना शिक्षणासाठी काही अडचणी असतील त्या दूर करून त्यांना पूढे आणले पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी सूर्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा, डॉ. अर्चना सूर्यवंशी, मोहिनी चौधरी, ज्योती जाधव मॅडम (लिटिल ब्लोसम स्कूल, धरणगाव) यांची उपस्थिती होती.