पिंप्री बु.येथे सत्संगासाठी आलेल्या लोकांना केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी…….!

प्रतिनिधी एरंडोल – पिंप्री बु.येथील शिवाजी महाराज चौकात १५ ते १६ आरोपींनी रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितल्याचा राग आल्याने सत्संगास आलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली.त्यात एक जण गंभीर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील पिंप्री बु.येथे ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवाजी महाराज चौकात घडली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व अमळनेरचे डि वाय एस पी विनायक कोते यांनी रात्रीच एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व तातडीने आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सविस्तर वृत असे पिंप्री बु.येथील धनंजय अनिल पाटील,रूपेश महेंद्र पाटील व जयवंत प्रकाश पाटील हे कबीर मंदिर येथे सुरू असलेल्या संत्संगाच्या कार्यक्रमासाठी जात असताना गावातील शरद नाना भिल,चेतन प्रकाश हटकर व ५ ते ६ अनोळखी मुले शिवाजी महाराज चौकात शरद भिल याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्यात उभे होते.धनंजय पाटील यांनी त्यांना सांगितले की आम्हाला जाण्यासाठी थोडा रस्ता द्या.तर ते म्हटले की तुझ्या बापाचा रस्ता आहे का? आम्ही केवडीपूरा, एरंडोलचे आहोत.तुझ्याने जे होईल ते करून घे.धनंजय पाटील यांनी गावातील शरद भिल यास सांगितले की यांना रस्त्याच्या बाजूला कर, महिलांना येण्याजाण्यासाठी त्रास होतो आहे.या बोलण्याचा शरद भिल व त्याच्या सोबत असलेल्यांना राग आल्याने शिवीगाळ व दमदाटी करून हायवेकडे निघून जात असतांना तुम्हाला एकालाही सोडणार नाही.अशी धमकी दिली.थोड्या वेळाने शरद भिल व त्याच्या सोबत १५ ते १६ हातात लाकडी काठ्या, दांडके घेऊन शिवाजी महाराज चौकात महादेव मंदिराजवळ आले.गोंधळ घालून धनंजय अनिल पाटील यांना मारहाण करून संत्संगासाठी आलेले धनंजयचे वडील मध्ये पडले असता त्यांनाही शरद नाना भिल याने लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने वडील अनिल विष्णू पाटील यांना जबर मारहाण केली.तसेच शरद भिल याच्या सह सर्वांनी दिसेल त्याला दांडक्याने व काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.या मारहाणीत अरविंद संजय पाटील, संदीप कृष्णा पाटील यांना सुध्दा दुखापत झाली.गोंधळ व आवाजामुळे आलेले लोक घटनास्थळी धावत आले असता शरद भिल व त्याचे सोबती हायवेच्या दिशेने पळून गेले.गावातील लोकांनी मारहाण करणाऱ्यातील काहींना पकडून ठेवले व पोलीसांच्या ताब्यात दिले.आरोपींची नांवे १) क्रिष्णा संजय ठाकरे,रा.केवडीपूरा २)आकाश लिलाचंद मोरे ( बिल ),रा.पद्मालय ३) महेंद्र राजू सोनवणे,रा.केवडीपूरा ४) इच्छाराम माऊजी सोनवणे,रा.केवडीपूरा ५) दिपक हिरामण ठाकरे,रा.पिंप्री ६)क्रिष्णा ज्ञानेश्वर मोरे,रा.पिंप्री ७) योगेश शांताराम भिल उर्फ मुन्ना रा.आहिरे ता.धरणगांव ८) सुकदेव गणेश सोनवणे,रा.पिंप्री ९) रोनी रघु मोरे,रा.पिंप्री व इतर २ ते ३ इसम पळून गेले.त्यांचा शोध पोलीस पथक करीत आहे.मारहाणीत अनिल विष्णू पाटील यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना न्युक्लेक्स हाॅस्पिटल, जळगांव येथे उपचारासाठी नेले असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.एरंडोल पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पवार हे पुढील तपास करीत आहेत.पोलीस पथकाने तातडीने कारवाई करीत आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहे.