जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल 95.08 टक्के

एरंडोल – येथील दि. शं. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा इ. 12 वीचा निकाल काल (दि. 5) जाहीर झाला असून विज्ञान शाखेतून अर्पिता दिलीप चव्हाण (85.67 टक्के) प्रथम, वाणिज्य शाखेतून सायली मंगेश चौधरी (74.50 टक्के) प्रथम तर कला शाखेतून दिव्या संतोष पवार (68.68 टक्के) प्रथम आली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल 95.08 टक्के लागला आहे.
महाविद्यालयातील कला शाखेतून 226 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातून 199 उत्तीर्ण तर 27 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम दिव्या संतोष पवार (68.67), द्वितीय अश्विनी रविंद्र पाटील (64.83), तृतिय नेहा एकनाथ महाजन (64.67), चतुर्थ दिनेश साहेबराव पाटील (64.67). वाणिज्य शाखेतून 110 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातील 105 उत्तीर्ण तर 5 अनुत्तीर्ण झाले आहेत. प्रथम सायली मंगेश चव्हाण (74.50), द्वितीय साक्षी प्रशांत मोराणकर (68.83), तृतीय अश्विनी जितेंद्र महाजन (64.17). विज्ञान शाखेतून एकूण 619 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातील 614 विद्यार्थी उत्तीर्ण, 5 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम अर्पिता दिलीप चव्हाण (85.67), द्वितीय रोहन जितेंद्र बडगुजर (84.67, तृतीय पार्थ संदीप पवार (84.50). किमान कौशल्य (इलेक्ट्रीकल) – 10 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम लोकेश रामचंद्र महाजन (54.67), द्वितीय आशिष रविंद्र बोरसे (53.17), तृतीय रोहित रविंद्र महाजन (52.17). किमान कौशल्य (ऑटो इंजिनिअरींग) – 12 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम प्रकाश लक्ष्मण पाटील (61.33), द्वितीय देविदास एकनाथ पाटील (58.00) तर तृतीय निलेश कैलास कुंभार (55.17) उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अमित पाटील, उपाध्यक्ष आनंदराव  पाटील, सचिव कोकीळाताई पाटील, संचालक संजय बापू पाटील, प्राचार्य ए. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. आर. एस. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एन. बी. गायकवाड, प्रा. व्ही. एस वाघ यांचेसह प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button