जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल येथील उन्नती माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश.

प्रतिनिधी – एरंडोल येथील उन्नती माध्यमिक विद्यालयाने या वर्षी देखील दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
1999 साली स्थापित झालेल्या या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची ही 23 वी बॅच होती. या शाळेत एरंडोल तसेच एरंडोल परिसरातील सर्व गावांवरून येणारे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये नेहमी सहभागी होत असतात व शाळेचे नावलौकिक उंचावत असतात. शाळेचा दरवर्षी दहावीचा निकाल उंचावत असतो शाळेत मराठी तसेच सेमी माध्यम असे दोन्ही माध्यम असून यावर्षी दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून यशाची परंपरा अखंड ठेवली आहे.
2024-25 चा शाळेचा निकाल ९०. ००% लागला असुन् त्यात कु. सेजल चिंतामण चौधरी ही ९४. ००% नी प्रथम,कु. पुनम सुनील पाटील ही ८६. २० % नी द्वितीय,कु. ममता जितेंद्र पाटील ही 84. 80% नी तृतीय आली आहे .
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण व इ १०वी चे वर्ग शिक्षक एच. डी. पाटील. तसेच शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button