क्राईमजळगावमहाराष्ट्र

दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी अटकेतील एका आरोपीस ३दिवसांची पोलिस कोठडी, २आरोपी फरार..! 

प्रतिनिधी एरंडोल: येथे पांडव वाड्या मागील परिसरात रविवारी दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या जबर मारहाण प्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीस सोमवारी एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यास ३दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्यात एकूण ५आरोपी असून त्यात २ महीला आहेत. २आरोपी अद्याप फरार असून एरंडोल पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. लवकरच फरार आरोपी जेरबंद होतील असा विश्वास तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान,
अमोल कैलास पाटील या युवकाची प्रकृती अतीचिंताजनक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button