क्राईमजळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथील मारहाण प्रकरणी अति चिंताजनक प्रकृती असलेल्या अमोल पाटील यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू……..!

प्रतिनिधी एरंडोल – येथे पांडव वाड्याच्या मागील परिसरात मोकळ्या जागेत दुचाकी लावण्यावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत अमोल कैलास पाटील वय ३१ वर्षे यांची जळगाव सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी प्राणज्योत मालवली.त्यांच्या पार्थीवावर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येथे पोलीस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.एरंडोल तालुक्यात या किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत अमोल पाटील यांचा नाहक बळी गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
     एरंडोल येथे पांडव वाड्याच्या मागील परिसरात रविवारी सकाळी एका कुटुंबावर शेजारील कुटुंबाने प्राणघातक हल्ला केला.या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला तुकाराम उर्फ अप्पा सिताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील,आशिष उर्फ आशू तुकाराम पाटील,दिपक उर्फ गोलू नामदेव पाटील,उषाबाई तुकाराम पाटील सर्व रा. गाढवे गल्ली एरंडोल या ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
          अमोल पाटील हे नागदुली येथे कंत्राटी तत्वावर ऑपरेटर म्हणून सेवेत होते.त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व पत्नी असा परिवार आहे.
          दरम्यान एक महिला आरोपी व तीन पुरुष आरोपींना एरंडोल न्यायालयासमोर बुधवारी हजर करण्यात आले असता महिला आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.तर ३ आरोपींना एक दिवसाची तसेच एका आरोपीस यापुर्वीच पोलीस कोठडी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button