जळगावमहाराष्ट्र
कामगारांसाठी बायोमेट्रिक नोंदणी कार्यक्रम…..

प्रतिनिधी – आमदार अमोल पाटील यांच्या प्रयत्नातून, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने रविवार, १ जून २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चौधरी मंगल कार्यालयात बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम चार दिवसांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
कामगार बायोमेट्रिक नोंदणी करण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून रांगेत उभे होते. ज्यामध्ये पुरुष कामगारांपेक्षा महिला कामगारांची संख्या जास्त होती. कोणत्याही वादविवादाशिवाय सर्वांनी स्वतःची नोंदणी केली. कामगारांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमदार अमोल पाटील यांचे आभार मानले.