शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी – एरंडोल शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व घरकुल लाभार्थींना जागेचे उतारे वाटपासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रखर व्याख्याते विनोद बाबर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता तसेच परिसरातील गुणवंत विद्यार्थी ज्यांनी इयत्ता दहावीच्या वर्गात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच जवखेडे सिम येथील 100 घरकुलांसाठी शासकीय गुरचरण जमिनीवर बांधकाम व्हावे म्हणून सदर जमिनीची जिल्हाधिकारी यांची परवानगी घेवुन या जागेचे उतारे गावातील लाभार्थी यांना वाटप आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अमोल पाटील यांनी आपल्या शुभेच्छा मनोगतात वासुदेव पाटील यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल तोंड भरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या तसेच जवखेडेसिम गावाने विधानसभा निवडणुकीसह मागील वीस वर्षापासून दिलेली साथ सहकार्या बद्दल आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी अमळनेर शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील, विक्रांत पाटील, प्रवीण पाटील, एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती दादाजी पाटील,युवा सेना माजी तालुका प्रमूख बबलु पाटील, युवासेना तालुका प्रमूख कमलेश पाटील,युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्ञानेश्वर कंखरे,धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती किरण पाटील, एरंडोल माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,शिवसेना उप तालुका प्रमुख बाळा पाटील,अंतुली येथील गौरव पाटील, बामणे येथील मुकुंदा पाटील, कुणाल पाटील, दिनेश आमले माजीसरपंच जवखेडे सिम यांच्या सह लोकनियुक्त सरपंच ठगुबाई सोनवणे व सर्व सदस्य विवीध कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपीचंद आमले व सर्व संचालक मंडळ यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी आजी माजी चेअरमन,संचालक मंडळ तसेच तालुक्यातील असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.