क्राईमजळगावमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले……

अमळनेर : तालुक्यातील पिंगळवाडे येथील रहिवासी तसेच आश्रम शाळेतील सातव्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना ४ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पिंगळवाडे येथील १४ वर्षे पाच महिने वयाची मुलगी आश्रम शाळेत सातव्या वर्गात शिकत होती. शाळेला सुट्या लागल्या म्हणजे ती आपल्या मोठ्या बहिणीकडे जानवे येथे जात येत होती. ३ रोजी मुलगी तिच्या आईवडीलांसह तिच्या घरीच झोपली होती. ४ रोजी पहाटे नळाला पाणी येणार म्हणून तिचे आईवडील पहाटे ३ वाजता उठले असता त्यांना मुलगी दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. तिच्या बहिणीकडे देखील विचारपूस केली मात्र मुलगी तेथे नसल्याने तिला फुस लावून पळवून नेण्यात आल्याची खात्री झाली. मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button