जळगावदेश-विदेशशैक्षणिक

एरंडोलचे साहित्यिक विलास मोरे यांची कविता मराठी बालभारती अभ्यासक्रमात.

प्रतिनिधी एरंडोल . – येथील साहित्यिक विलास  कांतीलाल मोरे यांची ” चांदोबाचं घर ” ही कविता  महाराष्ट्र  राज्य पाठय पुस्तक निमिती मंडळाच्या  बालभारती  इयत्ता पहिलीच्या मराठी अभ्यासक्रमात सन 2025 – 26 पासून समाविष्ट करण्यात आली आहे .
विलास मोरे यांची ” पांढरे हत्ती काळे दात ” ही संपूर्ण कादंबरी कवयित्री बहिणाबाई  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एम .ए .  ( कला शाखा )अभ्यासक्रमात  होती . तसेच त्यांची “धोंड्या” ही कथा प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अभ्यासाला आहे . त्यांच्या  ”  शाळेला सुट्टी लागली  रे  ” या बाल कविता संग्रहास   महाराष्ट्र शासनाच्या बालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या   ” पांढरे हत्ती काळे दात ”  या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे  यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार तसेच याच कादंबरीला  जामनेर मसाप शाखेचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार  अजरा , ठाणे , जळगाव ,  रेंदाळ – कोल्हापूर  या सह अनेक पुरस्कार  प्राप्त झालेले आहेत .
दिलीजराज प्रकाशन पुणे या प्रकाशन संस्थेने त्यांची १० पुस्तकं प्रकाशित केलेली असून   रत्री वेदनेची करुण कहाणी  विदित करणारी ” मुक्या विहीरीची आवाज ”  ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे .
“तिसरा डोळा ” या कांदबरीचे इंग्रजी भाषांतर प्रा . सुरेश पांडे  आणि “शाळेला सुट्टी लागली रे “: बाल कविता संग्रहाचे इंग्रजी भाषांतर डॉ.एस.आर.पाटील यानी केले असून ते या पूर्वी  प्रकाशित झाले आहेत.विलास मोरे यांची  कथा  ,कविता ,कादंबरी ,बाल कथा , बालनाट्य , बाल कादंबरी  असे एकुण १६ पुस्तके  प्रकाशित झालेली आहेत .  आधारवर चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका असून ” झाला वारा मंद ”  व ” सेल्फी फोटू .”  हे दोन व्हिडिओ अल्बम प्रसिद्ध आहेत .
            एम.ए.  ते  इयत्ता पहिली  अशा या पाठ्यपुस्तकातील  अभ्यासक्रमाच्या   प्रवास असून  त्यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील मराठी भाषा विभाग प्रमुख ,  साहित्यिक , .मानवतावादी विचारवंत डॉ . म .सू .पगारे , डॉ.एस.आर.पाटील ,  स्टार प्लस  वरील ऐतिहासिक मालिका लेखक प्रताप गंगावणे,  संगीतकार अमर देसाई, डॉ  . माधव कदम , डॉ . जितेद्र गिरासे , डॉ . वासुदेव वले ,  प्रा . सुरेश पांडे ,   ॲड . मोहन  बी .  शुकला ,   वि .दा : पिंगळे, अशोक सोनवणे  , डॉ . मिलिंद बागुल ,   प्रा जी . आर . महाजन  प्रा देवबा पाटील ,  व विविध साहित्यिक संस्था  प्रतिनिधी तसेच साहित्यिक, सांस्कृतिक   व राजकीय क्षेत्रातील  मान्यवरांनी यांनी अभिनंदन केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button