अपघातक्राईमजळगावमहाराष्ट्र

एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी,
पत्नीने केली घातपात असल्याची तक्रार.

प्रतिनिधी – एरंडोल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा या अपघात नसून घातपात केला असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी कल्पना महाजन यांनी केली आहे.
       याबाबत एरंडोल पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन व त्यांचे मित्र ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव महाजन रा.भालगाव हे दोघे मोटार सायकल क्र.एम.एच.१९ इ.एच.९१५१ ने दशरथ महाजन यांच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या पोल्ट्री फार्मसाठी भराव करण्यासाठी मुरूम लागत होता.त्यासाठी म्हणून ते भालगाव येथे गेले होते.दशरथ महाजन यांनी नाना महाजन यांना भालगाव येथे सोडले व ते भालगाव बोरगाव रस्त्याने एकटे परत एरंडोल येथे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.यावेळी त्यांचा डावा डोळा निकामी झाला असून छातीच्या ७ बरगड्या तुटल्या आहेत,फुफ्फुस,यकृत यास गंभीर इजा झाली असून डोक्याला व मेंदूला देखील इजा झाली आहे.दोन्ही पायांचे हाड तुटली आहेत.त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान याबाबतीत त्यांच्या पत्नी कल्पना महाजन यांनी माझे पती सामाजिक व राजकीय क्षेत्रात मान्यवर व्यक्तिमत्व असून त्यांच्या अपघाता बाबत आमचा अज्ञात वाहन चालकाविरुद्ध घातपाताची शंका उपस्थित केली आहे.याप्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर,अमळनेर विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पथक तथा एरंडोल पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक विकास देशमुख,सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गबाले,अनिल पाटील,राजेश पाटील, संदिप पाटील,मिलिंद कुमावत आदी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button