डी. फ़ार्मसीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १००%

प्रतिनिधी – येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या डिप्लोमा फार्मसी चा उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ द्वारे नुकताच जाहीर करण्यात आला, त्यात विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाले. प्रथम व द्वितीय वर्ष डी. फार्म परीक्षेचा १००% निकाल लागला. प्रथम वर्ष डी. फार्म च्या पाटील भाग्यश्री संजय हिने ६८.८० % मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, पवार भाऊसाहेब किसन याने ६८.१० % मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर धनगर रुचिता विजय व पाटील महेंद्र आत्माराम या दोघांनी ६८% मिळवून त्रितिय स्थान प्राप्त केले. द्वितीय वर्ष डी. फार्म मध्ये ममता लक्ष्मण पाटील हिने ८२.१८ % मिळवून प्रथम क्रमांक पुन्हा पटकावला, मागील वर्षी देखील या विद्यार्थिनीने प्रथम वर्ष डी. फार्म मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. लोहार प्रिया मच्चीन्द्र हिने ७७.६४ % मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर पाटील वैष्णवी देविदास हिने ७५.६४ % मिळवून त्रितिय स्थान प्राप्त केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशा बद्दल संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री, प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.