क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

देहविक्री करणाऱ्या वस्तीवर पोलिसांचा छापा..

प्रतिनिधी अमळनेर : गांधलीपुरा भागात अमळनेर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री करणाऱ्या दोन मालकीणी  देहविक्री करणाऱ्या नऊ महिला आणि नऊ ग्राहकांना अटक करून पिटा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.*
        गांधलीपुरा भागात वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या. मात्र पोलीस जाण्यापूर्वी त्या पळून जात असल्याने कारवाई करण्यास अडचण येत होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी  गोपनीयता पाळत सुनसान जागेवर पोलीसांची बैठक घेत तेथूनच सापळा रचून खाजगी वाहनाने १ जुलै रोजी दुपारी साडे चार वाजता गांधलीपुरा भागात छापा टाकला. वेगवेगळ्या घरात व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.

या आहेत मालकीनी व देहविक्रेत्या

      पोलिसांनी फरार झालेल्या  महिलेच्या घरात  देहविक्री करणाऱ्या रंजना विजय सरदार, वय ४६ वर्षे, रा. अमरावती ता.अमरावती,
सुनिता प्रशांत कांबळे, वय ४० वर्षे, रा. आसनसोल ता.जि. आसनसोल राज्य पश्चिम बंगाल, नसरीन बानु मोहम्मद कुदुस, वय ३५ वर्षे, रा. गांधलीपुरा अमळनेर यांना
तर मालकीण शशीकला मदन बडगुजर वय ५०  वर्षे, रा. जुना नगर परिषदेच्या सरकारी दवाखान्याजवळ, गांधलीपुरा, अमळनेर हिच्याकडे देहविक्री करणाऱ्या  वंदना कैलास चौधरी वय ४०  वर्षे, रा. गांधलीपुरा,  नरगीस शेख इकबाल, वय ३० वर्षे, रा. एकविरा देवी मंदीराजवळ, देवपुर धुळे ता.जि.धुळे आरिफा शेख नासीर वय ४० वर्षे, रा. गांधलीपुरा तसेच
मालकीण  मिना दिपक मिस्तरी वय ६० वर्षे, रा. शेतकी संघ, गांधलीपुरा, हिच्याकडे  कविता रामचरण तायडे वय ४५  वर्षे, रा. भोराडा ता.अंजनगांव जि. अमरावती, आशा सुकलाल बुद्रा वय ४० रा. आसनसोल ता.जि. आसनसोल राज्य पश्चिम बंगाल, शांतना सचिन बिश्वास वय ३८ वर्षे, रा. आसनसोल ता.जि. आसनसोल राज्य पश्चिम बंगाल याना अटक केली
    हे आहेत ग्राहक
त्याचप्रमाणे त्यांच्याकडे ग्राहक म्हणून गेलेले शाहरुख शेख असलम वय ३०  वर्षे, रा. खडकपुरा पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव ,समाधान मांगलु पाटील वय ३२ वर्षे, रा. शिरसमणी ता. पारोळा करण कैलास भिल वय १७ वर्षे, रा. गलवाडे ता. अमळनेर ,उदय दिलीप शितोळे वय ४० वर्षे रा. भडगांव ता. भडगांव ,निखील बापु बच्छाव वय १९ वर्षे, रा. पिंप्री ता. धरणगांव ,बस्तीलाल गोविंदा पाटील वय ३३वर्षे, रा. खडके खु॥ ता. एरंडोल ,जावेद शेख सत्तार वय ४२  वर्षे, रा. गांधलीपुरा, नामदेव वामनराव बडगुजर, वय ७८  वर्षे, रा. शिवनेरी नगर, चाळीसगांव यांनाही अटक केली आहे.

      यांनी केली कारवाई
डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक  दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक  भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर समाधान गायकवाड,  पोहेकॉ  गणेश पाटील, प्रदिप खैरनार, कैलास शिंदे,  मिलींद सोनार,  विनोद भोई,  विनोद सोनवणे,  सिध्दांत शिसोदे,  मंगल भोई,  अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे,  विनोद संदाशिव,  प्रशांत पाटील, नितीन कापडणे,  मयुर पाटील,  निलेश मोरे,  राहुल पाटील,  राहुल पाटील,  उज्वलकुमार म्हस्के, भुषण परदेशी,  राहुल चव्हाण,  नरेश बडगुजर,  संजय सोनवणे,  वाल्मीक पाटील,  गणेश पाटील,  उदय बोरसे,  शामल पारधी,  वैष्णवी  पाटील  होमगार्ड   निलीमा  पाटील ,  ममता सुनिल ठाकरे , मनिषा राजेंद्र वारुळे,    निलीमा ज्ञानेश्वर पाटील  यांनी संयुक्तिक कारवाई केली आहे तसेच पंच म्हणून  आसिफ मुसा खाटीक  दिपक रमेश सिंधी, निर्मला चंद्रकांत मोरे यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांनी फिर्याद दिल्यावरून पिटा ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक   दत्तात्रय  निकम करीत आहेत.
      दत्तात्रय निकम  पोलीस निरीक्षक अमळनेर  

व्यवसाय करणाऱ्या ९ महिलांना महिला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. तर तिन्ही महिलांची घरे सील करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे

या कारवाईमुळे गांधलीपुरा भागात देहविक्री व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, स्थानिक नागरिकांतून पोलिसांच कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button