जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

बचपन स्कूल धरणगाव रोड येथे विनंती थांबा मान्य-संघर्ष समितीच्या मागणीला यश.

प्रतिनिधी एरंडोल – एक चक्र नगरी मानव सेवा प्रतिष्ठान संचलित संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच एसटी महामंडळाच्या एरंडोल डेपोच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला. यावेळी  नागरिकांच्या  विविध समस्या मांडल्या. याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष रविंद्र लाळगे, उपाध्यक्ष नामदेवराव पाटील पदाधिकारी पंडित साळी, रघुनाथ कोठावदे, धनसिंग पाटील, भगवान चव्हाण आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नव्यानेच रुजू झालेले शाखा व्यवस्थापन यांचा सत्कार करण्यात आला व समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात येवून विविध समस्या त्यांच्यासमोर चर्चा करण्यात आल्या.  यापूर्वी देखील दोन वेळेस निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती परंतु त्याबाबत कोणतेही कार्यवाही न केल्याबद्दल समितीने खंत व्यक्त केली तसेच पुन्हा असे होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रवाशी सोयीसाठी जळगाव एरंडोल बस कायमस्वरूपी चालू करून नियमित असावी, धरणगाव-भडगाव त्याचप्रमाणे एरंडोल-धरणगाव, एरंडोल-भडगाव, जामनेर-जळगाव या बस जशा चालतात त्याप्रमाणे एरंडोल-जळगाव जनता बस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या एरंडोल-इंदोर सुरू करावी अशा प्रकारची मागणी यापूर्वीही करण्यात आलेली आहे. धरणगाव एरंडोल जाणार्‍या बसेसला धरणगाव चौफुली व बचपन स्कूल कॉर्नर जवळ विनंती थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली . बचपन  स्कूल जवळ विविध प्रकारचे कॉलनीला जाणारी रस्ते एकत्र येतात. या ठिकाणी प्रवासी उतरू शकता, चढू शकतात. कॉलनी परिसरातील विविध मार्ग या ठिकाणी निघतात त्यामुळे या ठिकाणी विनंती थांबा दिला गेला पाहिजे या थांब्यांबाबत व्यवस्थापकांनी मान्यता दिली.  एसटी डेपो परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो बस स्टँडच्या पाठीमागे अतिशय दुर्गंधी आहे, झाडेे वाढलेले असून याबाबत साफसफाई करण्यात यावी, सदर एरिया सुशोभीकरण करण्यात यावा, बस स्टॅन्डमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, पंखे नेहमी  सुरू केले पाहिजे, स्वच्छतागृहाची स्वच्छता केली पाहिजे,  एसटी महामंडळाने समितीला वेळापत्रक उपलब्ध करून द्यावे, सूचना फलक असावा प्रवासी लोकांसाठी अत्यावश्यक सूचना त्यावर नमूद कराणे, गाडी लेट होते, लवकर सुटते अथवा एखाद्या वेळेस रद्द केली जाते याबाबतची कल्पना प्रवाशांना येत नाही यासाठी सूचनाफलकाचा दैनंदिन वापर करावा आदी मागण्या करण्यात आल्या. व्यवस्थापक बेंडकुळे यांनी चांगला प्रतिसाद दिला व समितीला आश्वासन दिले की आपल्याला पुन्हा येण्याची गरज पडणार नाही हा डेपो नागरिकांचा आहे आम्ही फक्त सेवक आहोत अशा प्रकारची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button