एरंडोल आगाराच्या गाड्या निघाल्या पंढरपुर जाणाऱ्या वारकरीच्या सेवेत

प्रतिनिधी – एरंडोल तथा परिसरातील भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडवण्यासाठी येथील आगारातून १५ बस गाड्यांची व्यवस्था विभाग नियंत्रण भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आगारातून एरंडोल धरणगाव पंढरपूर बस सकाळी सात वाजता सुटते. हो संध्याकाळी ५.३० मिनिटांनी एरंडोल इथून प्रस्थान करते. १७००ते २००० भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा लाभ लालपरि मार्फत घडून आला.
जवळपास दोन लाख ६८ हजार १५९ एवढे उत्पन्न विना सवलत प्रवासी भाविकांकडून मिळाले . तर सवलतीची उत्पन्न पाच लाख ३७ हजार एवढे उत्पन्न मिळाले. अशी माहिती आधार व्यवस्थापन निलेश बेंडकुळे, बस स्थानक प्रमुख गोविंदा बागुल यांनी दिली. पंढरपूर यात्रेसाठी बसेस सुयोग्य स्थितीत उपलब्ध करून देण्यासाठी आकारातील चालक वाहक यांत्रिक प्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी मेहनत घेत आहेत.