जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.

प्रतिनिधी – एरंडोल राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे लोकप्रिय नेते ना.गिरीश महाजन यांचा सत्कार शिक्षक समन्वय संघ जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जामनेर येथे प्रा.अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात शिक्षक बांधवांना समवेत करण्यात आला.
   शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करून शासन दरबारी भूमिका मांडणाऱ्या शिक्षक समन्वय संघाच्या मागण्यांबाबत ना.महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेतली. टप्पा वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यापासून ते निधी तरतूद करण्यात पर्यन्त ना.महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाला अंतिम मान्यता मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले.
अनिल परदेशी सर हे नाव गेल्या १५–१६ वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षकांच्या हक्कासाठी अविरत गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सातत्याने परदेशी यांच्या नेतृत्वात शिक्षक मतदारसंघांमध्ये टप्पा अनुदानाबाबत भेटायची प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत आग्रह होता. हजारोच्या संख्येने असलेल्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली, सकारात्मक भूमिकेतून न्याय शिक्षकांना दिला.
सत्कार प्रसंगी बोलताना प्रा.अनिल परदेशी यांनी सांगितले की, “ना.गिरीश महाजन हे केवळ राजकिय नेते नाहीत तर शिक्षकांच्या हितासाठी झटणारे खरे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आंदोलनाचा गांभीर्याने विचार करत शिक्षकांच्या समस्या मार्गी लावल्या,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टप्पा वाढीचे धोरण,प्रश्नाचे गांभीर्य याबद्दल योग्य अशी शिष्टाई केली.परिणामी आंदोलन कर्त्या शिक्षकांच्या प्रयत्नांना निधी तरतूद रुपात यश मिळाले.याबद्दल त्यांचा संघाच्या वतीने मन:पूर्वक सत्कार करण्यात आला.
   या कार्यक्रमास प्रा.अनिल परदेशी, प्रा.मुकुंदा आडाव, प्रा.दिनेश पाटील ,प्रा.प्रकाश तायडे, प्रा.राहुल निकम, प्रा.रवी पवार,प्रा.विजय ठोसर, प्रा. योगेश धनगर, प्रा.सुधिर शिरसाठ , प्रा.अरुण पाटील,प्रा.अमृतराज पाटील प्रा.संदीप राजपूत,प्रा.वसंत गांगुर्डे,प्रा.रुपेश चौथे,प्रा. सूर्यवंशी, प्रा.गजानन बोरसे, प्रा.विनोद राजपूत व शिक्षक समन्वय संघाचे अनेक पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button