*एरंडोल येथे श्री खोल महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा……..!*

प्रतिनिधी एरंडोल – येथे जहाँगीरपूरा भागातील श्री खोल महादेव मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झालेले असून २९ जुलै २०२५ मंगळवार रोजी सकाळी पुरातन स्थापित जिर्ण मुर्तीचा तेजोलारण विधी पार पडला.तर दुपारी श्रीगणेश, पार्वतीमाता, महादेव व नंदी महाराज या नव्या मुर्तींची शहरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास नुतन मुर्तींना ध्यान्याधीवास विधी पार पडला.
तसेच ३० जुलै २०२५ बुधवार रोजी दिवसभर विविध विधी पार पडले.यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.तर ३१ जुलै २०२५ रोजी स्थापित देवतांचे प्रात: पुजन,मुख्य देवतांना दशविधी स्नान अभिषेक व इतर मुर्ती स्थापना विधी होणार आहेत.संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
सदर मंदिर पुरातन कालीन असून जेंव्हा जेंव्हा एरंडोल तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली.तेंव्हा भाविकांनी अंजनी नदीचे पाणी आणून खोल महादेव मंदिराचा गाभारा पुर्ण पाण्याने भरून मनोभावे प्रार्थना केल्याने वरूण राजाची कृपादृष्टी होऊन पावसाचे आगमन झाले.असे वयोवृद्ध जुने जाणत्या भाविकांनी सांगितले.मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी व प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ॐ नमः शिवाय मित्र मंडळ, जहाँगीर पुरा, एरंडोल यांनी विशेष परिश्रम घेतले.