*भरधाव जाणारी एस.टी.बस वळणावर पलटी होऊन भीषण अपघात,१ प्रवासी जागीच ठार,१५ गंभीर जखमी………!*

प्रतिनिधी एरंडोल – भडगांव एरंडोल मार्गावर एरंडोल पासून दिड कि.मी.अंतरावरील नायरा पेट्रोल पंप जवळ वळणावर शुक्रवारी १ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भडगाव – एरंडोल या एम एच २० बी एल ३४०२ क्रमांकाच्या एस.टी.बस चालक ज्ञानेश्वर भास्कर चव्हाण याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने बस चालवत नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या खोल नाल्यात पलटी झाली.या दुर्दैवी घटनेत गुलाब तुळशीराम महाजन,वय ५५ वर्षे,रा.वडगांव ता.पाचोरा यांचा बस खाली दबून जागीच ठार झाले.अपघातात ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले.सदर घटना ११.१५ वाजेच्या सुमारास घडली.जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.तसेच वाहक खटाबाई मोरे या सुद्धा जखमी असून उपचार घेत आहेत.
या अपघातात १५ प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व अन्य खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.या व्यतिरिक्त ३५ किरकोळ जखमी प्रवाशांवर एरंडोल येथेच प्राथमिक उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत.
जखमींची नांवे पुढील प्रमाणे आहेत.
गोविंदा चुनामण सोनवणे वय ३२ रा. कासोदा,निर्मलाबाई चुडामन सोनवणे वय ६५ रा.कासोदा, शांताराम रामदास पाटील वय ६० रा.आडगाव ,लताबाई शांताराम पाटील वय ५८ रा.आडगाव,वेदांत रमेश महाजन वय ४४ रा.आडगाव जिजाबाई आनंदा जाधव,वय ६० रा.सावरगाव ,
दगुबाई अप्पाजी जाधव वय ६२ रा.सावरगाव,
सुरेखा राजेंद्र जाधव वय ३५ रा. सावरगाव,
गंगाबाई नाना चौधरी वय ५५ रा.धरणगाव,
कमलबाई भिमराव पाटील वय ७० रा.सोयगव्हाण,बायजाबाई विठ्ठल पाटील वय ५५ रा.सोयगव्हाण,कोमलबाई भिमराव पाटील वय ७० रा.सोयगव्हाण,सखुबाई विलास गोसावी वय ६० रा.भातखेडे,अमोल आबासाहेब पाटील वय २५ रा.पाथर्डी,
तुळसाबाई रामदास पाटील वय ५५ रा.खडके खुर्द,शोभाबाई रमेश पाटील वय ५५ रा.खडके खुर्द,मनीषा पाटील वय २० रा.खडके,कल्पनाबाई धनसिंग पाटील वय ५५ रा.विरावली,भास्कर मनुसिंग भिल वय ५० रा.उमरे,मायाबाई भास्कर भिल वय ४५
रा.उंबरे ,कल्याणी नाना भिल वय १९,सपना विशाल भिल,रा.उमरे ,मयुरी अशोक पाटील वय १६ रा .खडके खुर्द,निकिता बाळू पाटील वय १९ रा .खडके खुर्द,रोशनी प्रवीण पाटील वय १८ खडके खुर्द,कोमल सोनसिंग पाटील,सोहन दीपक पाटील रा .खडके खुर्द,विलास गोसावी वय ६० रा.भातखेडे,शोभाबाई रमेश पाटील रा.खडके,मनोज महारु पाटील वय १८ रा.खडके बु.,उन्नती धनसिंग पाटील वय १७ रा.खडके बु.,अनुसयाबाई दत्तू बडगुजर वय ६५ रा .पिंपरखेड, रत्नाबाई रतिलाल धनगर वय ५०रा. चांदणी कमळगाव,मनीषा सोमसिंग पाटील वय २० रा .खडके, कल्पनाबाई धनसिंग पाटील वय ५५ रा.खडके,भास्कर मनुसिंग भिल वय ५० रा .उमरे,ऋषिकेश शरद पाटील वय १८ रा.फरकांडे,उत्कर्ष समाधान पाटील वय दीड वर्ष रा .वडगाव सतीचे,भाग्यश्री पंकज पाटील वय १७ रा .खडके,मयुरी पंडित पाटील वय १७ रा.खडके,नौशौद्दीन शेख वय ५० रा.भडगांव,हरिदाबी जुबेर कुरेशी वय ५० रा .कासोदा,शहिनाबी फिरोज कुरेशी वय ३८ रा.कासोदा,मुसीर खान वय ७५ रा.कासोदा, नेहरू बाबुलाल पाटील वय ५० रा.भडगांव,आनंदा महादू पाटील वय ६५ रा.निपाणे,हुनबी खान वय ६८ रा.कासोदा.
सदर घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पाटील,विजय पाटील, कपिल पाटील,बापु पाटील, दिपक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने बस नाल्यातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच,तलाठी, मंडळ अधिकारी,पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल पाटील यांनी ग्रामीण रूग्णालय येथे भेट देऊन जखमी रूग्णांची चौकशी करून डि.डी.एस.पी.महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील,सुदाम पाटील,सुहास महाजन यांनी तसेच शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा .मनोज पाटील,मयुर मराठे,भुषण चौधरी, प्रा . जितेंद्र महाजन,पत्रकार कैलास महाजन व छत्रपती क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते यांनी रूग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थी तसेच रूग्णांची चौकशी करून मदत कार्य केले.
याप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा,एम इ ओ पाटील,एरंडोल आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे व बसस्थानक प्रमुख गोविंदा बागुल यांनी एस टी महामंडळ प्रशासनातर्फे अपघातात मृत व्यक्तीच्या वारसाला १० लाख रुपये जाहीर मदत दिली जाईल असे सांगितले तसेच जखमींना प्रत्येकी ५०० रूपये तात्काळ रोख मदत दिली.गंभीर जखमींच्या पुढील उपचारासाठी येणारा सर्व खर्च महामंडळातर्फे अदा करण्यात येणार आहे.