अंजनी नदीची झाली गटारगंगा-संताप

प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल हे ऐतिहासिक शहर असून या शहरातून अंजनी नदी वाहते परंतू या नदीची गटारगंगा झाल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. कचरा, प्लास्टिक, काटेरी झुडूपे यामुळे अस्वच्छता तर झाली आहेच परंतू दुर्गंधी देखील वाढली आहे.
विशेष खेदाची बाब म्हणजे वृत्तपत्रांमध्ये (सर्वच) घाणीचे फोटो येवून देखील अधिकारी वर्ग डोळे असून आंधळे आहेत असे खेदाने म्हटले जात आहे. नपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे तर लक्षच नाही. प्रांताधिकार्यांनी नपा आणि अंजनी अधिकार्यांना आदेश देवून देखील काहीही फरक पडला नाही. उडवा उडवीची उत्तरे देवून वाट लावली जाते.
प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येक जिल्ह्यात असून देखील अंजनी नदीसाठी एकदा देखील त्यांनी एरंडोलला फिरकू नये यास म्हणावे तरी काय ? झोपले आहेत का ? असा संतप्त सवाल असून पावसाळा सुरू होवून दोन महिने उलटले तरी अंजनी नदी स्वच्छ नाही यास म्हणावे तरी काय ? नपाकडे आरोग्य खाते करते काय ? सध्या पावसाळा असल्याने जिकडे तिकडे चिखल, घाण असून फवारणी करावी हे सांगावे लागते ही खेदाची बाब आहे.