शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एरंडोलचा संस्थेला सलग चौथ्यांदा अति उत्तम मानांकन प्राप्त

प्रतिनिधी एरंडोल:-तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (एरंडोल) या महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई कडून मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत अति उत्तम मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे एरंडोल तालुक्यातील शिक्षण क्षेत्राची शान व मान उंचावली आहे.
या मानांकन प्रक्रियेत अध्यापनाची गुणवत्ता, प्रयोगशाळा, व संशोधन सुविधा, विद्यार्थ्यांचे निकाल, प्राध्यापकांचे योगदान, विद्यार्थी कल्याण योजना, आधुनिक ग्रंथालय सुविधा, तसेच संस्थेचे सामाजिक कार्य या सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. त्यात शास्त्री महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध करून राज्यातील अग्रगण्य महाविद्यालयाच्या यादीत स्थान पटकावले
विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्ता पूर्ण शिक्षणच नव्हे तर संशोधन क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक कार्यातही प्रोत्साहन देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न महाविद्यालयाकडून होत असतो या प्रयत्नांचे फलित म्हणून अतिउत्तम मानांकन मिळाल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉक्टर विजय शास्त्री यांनी केले.
संस्थेच्या यशाबद्दल संस्थेच्या सचिव रूपाशास्त्री यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे तसेच संस्था पुढील काळात संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांवर अधिक भर देईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या कामगिरीमुळे एरंडोल तालुक्याचे शैक्षणिक स्थान अधिक बळकट झाले असून परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे उपप्राचार्य डॉक्टर पराग कुलकर्णी यांनी सांगितले.