डॉ. एन. के. आर. शिरोळे नर्सिंग कॉलेजमध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा

शप्रतिनिधी एरंडोल : डॉ. एन. के. आर. शिरोळे नर्सिंग कॉलेज ऑफ एरंडोल येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सजावट करून गणरायाचे स्वागत केले. विविध उपक्रमांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाविद्यालय परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी गणेशमूर्तीची पर्यावरणपूरक सजावटीत नैसर्गिक रंग, फुलं, पाने आणि पुनर्वापरातील वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
महाविद्यालयातील प्राचार्य आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे व उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उपक्रमशीलतेने भरलेला सहभाग पाहून सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारे उपक्रमही राबविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.