जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास या विषयावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न.

एरंडोल : येथील दादासाहेब दि. शं. पाटील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या करून सांगितलं  पीएम उषा युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन दिल्ली अंतर्गत कौशल्य विकास या विषयावर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे दि. ०९ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन  केले गेले. कार्यशाळेचे उद्घाटन कबचौ उमवि, जळगाव च्या व्यवस्थापन परिषद सदस्या प्रा. डॉ. सुरेखा पालवे याच्या हस्ते करण्यात आले तर संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील अध्यक्षस्थानी होते.
आपल्या उद्घाटनपर संबोधनात प्रा. डॉ. सुरेखा पालवे यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांना आपले करियर घडविण्यासाठी आवश्यक विविध कौशल्यांची गरज अधोरेखित केली. त्यांनी पुढे सांगितले की तुम्ही ज्या क्षेत्रात करियर करत आहात त्या क्षेत्रासंबंधी सर्व कौशल्य अवगत केल्याने तुमचे व्यक्तित्व प्रभावी बनेल.  हे त्यांनी अनेक उदाहरणासह पटवून दिले.  मा. अमितदादा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात आशा व्यक्त केली विद्यार्थी या कार्यशाळेत मिळणाऱ्या कौशल्यांचा उपयोग आपल्या जीवनांत करतील आणि आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यशस्वी होतील.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी आपल्या संबोधनात त्यांनी व्यावसायिक व तांत्रिक कौशल्यासोबतच एआय संबधित कौशल्यही विद्यार्थ्यांनी शिकावे असा सल्ला दिला.  कार्यशाळा चार सत्रा मध्ये पार पडली.  पहिल्या सत्रात Life Skills या विषयावर क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव च्या डॉ. वीणा महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात एस. पी. डी. एम. महाविद्याल, शिरपूर येथील  प्रा. डॉ. नागोराव डोंगरे यांनी Mindfulness : Problem Solving Skill या विषयावर मार्गदर्शन केले.  तिसऱ्या व चौथ्या सत्रात अहमदनगर कॉलेज, अहिल्यानगर येथील प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी अनुक्रमे Decision Ability and Time Management  आणि Yearn’ness to Develop या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रेखा साळुंखे यांनी केले तर डॉ. राम वानखेडे यांनी सूत्रसंचलन केले. आपल्या प्रस्ताविकात डॉ. रेखा साळुंखे यांनी कार्यशाळचा आयोजनाचा उद्देश व महत्त्व विशद केले.  कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य उपप्राचार्य डॉक्टर अरविंद बडगुजर यांच्यासह डॉ. नरेंद्र तायडे, डॉ. राम वानखेडे, डॉ. संदीप कोतकर, डॉ. सोपान साळुंखे, डॉ. स्वाती शेलार, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ. सविता पाटील, प्रा. सुनील सजगने, प्रा. योगेश येंडाइत, प्रा. सागर विसपुते, प्रा. उमेश सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. तसेच डॉ. प्रफुल्ल ठाकरे, डॉ. हेमंत पाटील, प्रा. सुरज वसावे, प्रा. महेंद्र शिरसाठ, प्रा. नितीन पाटील, प्रा. शेखर पाटील यांनी कार्यशाळेस भेट दिली. कार्यशाळेत एरंडोल महाविद्यालय, धरणगाव महाविद्यालय, किसान महाविद्यालय, पारोळा, एस.एस.बी.टी. महाविद्यालय, जळगाव, केसीई महाविद्यालय, जळगाव, गोदावरी महाविद्यालय, रायसोनी महाविद्यालय, जळगाव, मणियार विधी महाविद्यालय, चोपडा फार्मसी महाविद्यालय व जवळपासच्या महाविद्यालयातील १७२ विद्यार्थिनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button