मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआर विरोधात एरंडोल येथे ओबीसी बांधवांचा एल्गार

प्रतिनिधी एरंडोल:- येथे मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढला तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेतर्फे उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना ९ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन देण्यात आले. ओबीसी मध्ये पहिल्याच ३५० पेक्षा जास्त जाती आहेत त्यांना अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. जर त्यात पुन्हा एक मोठा वर्ग समाविष्ट करण्यात आला तर हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे.
निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष अरुण महाजन कार्याध्यक्ष गजानन महाजन,
माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,राजेंद्र चौधरी, आनंदा चौधरी, गोपाल शामू पाटील, रमेश महाजन, गोरख नारायण महाजन, अनिल महाजन जगदीश मोरे सचिन विसपुते, नानाभाऊ महाजन सुनील चौधरी, विशाल सोनार, रामचंद्र गांगुर्डे, अतुल महाजन,विशाल देशमुख गणेश न्हावी ,जितेंद्र बडगुजर, गणेश गांगुर्डे,संदीप पाटील सुदर्शन महाजन आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.