एरंडोल येथे २२० रुग्णांनी केली मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात तपासणी.

प्रतिनिधी – एरंडोल येथील साई गजानन संस्थान एरंडोल, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, एरंडोल, आर. झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल, नामदार गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन पाळधी, संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडी, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आज एरंडोल येथील साई गजानन मंदिरात आयोजन करण्यात आले होते.सुमारे २२० रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी शस्त्रक्रियेसाठी ८० जण पात्र ठरले.त्यातील ५२ रुग्णांची पनवेल येथे ऑपरेशन साठी रवानगी करण्यात आली. सदर शिबिरासाठी साई गजानन संस्थानचे अध्यक्ष बापू मोरे व त्यांचे सहकारी विश्वस्थ, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थे चे चेअरमन प्रा.जी.आर. महाजन व पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय योगेश्वर पतसंस्थेचे मॅनेजर मंगेश पाटील,संचालक प्रकाश पाटील,वंदनाताई कुळ- कर्णी,कॅशियर दिपक पाटील, जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील,असिफ मणियार, यांनी नोंदणीची जबाबदारी सांभाळली.सदर शिबिरासाठी पनवेल च्या आर. झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल चे डॉ. आसाद अन्वर, डॉ. विजय बामणे, परिचारिका नियती शिंदे,प्राजक्ता गायकवाड तसेच संकल्प सेवा फॉउंडेशन चे डॉ.राहुल चौधरी,भूपेंद्र वाघ, प्रशांत कोळी यांनी तपासणी केली.
सदर शिबिराला गावातील अनेक व्यक्तींनी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यात विवेकानंद केंद्राचे नरेश डागा,बी.के.धूत,डॉ. नरेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन शालिग्राम गायकवाड,गुजर समाज्याचे अध्यक्ष गोपाल पाटील, सह.सचिव दिनेश महाजन,भा. ज. प. पदाधिकारी विवेक ठाकूर,सर्योदय जेष्ठ नागरिक संघांचे सेक्रेटरी कुळकर्णी, कवी निंबा बडगुजर,पी.जी. चौधरी,योगेश्वर नागरी पतसंस्था चे संचालक गोपाल महाजन,लोटन धनगर,सुनंदा गुजर,साई गजानन मंदिराचे विश्वस्थ चेतन महाजन,अनिल पाटील,अनिल चौधरी व अनेक सेवेकरी पद्मालय सह.पतपेढीचे संचालक महेश शिरोडे, यांनी भेट देऊन कार्याविषयी समाधान व्यक्त केले.एरंडोल व आसपासच्या गावातून रुग्ण आले.