*एरंडोल येथे रा.ति.काबरे विद्यालयात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व दिंडी सोहळा……..!*

प्रतिनिधी एरंडोल – येथे रा.ति.काबरे विद्यालयात १६ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत रा.ति.काबरे विद्यालयात वृक्षारोपण व दिंडी सोहळा पार पडला.
यावेळी शालेय परिसरात संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे, सचिव राजीव मणियार, उपसचिव धिरज काबरे, सदस्य डॉ.नितीन राठी,परेश बिर्ला, सतीश परदेशी,अरूण पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सकाळी १० वाजेच्या सुमारास शालेय पटांगणावर दिंडी काढण्यात आली.विद्यार्थी हातात ध्वज व फलक घेऊन ‘ एक वृक्ष एक जीवन ‘ व पंतप्रधानांच्या ‘ स्वच्छ भारत हरित भारत ‘ अशा घोषणा देण्यात आल्या.दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.एस.राठी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.