जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र
*एरंडोल तालुका महसूल सेवक संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन……….!*

प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल तालुका महसूल सेवक संघटनेतर्फे १९ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात येऊन महसूल सेवकांना तातडीने चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा देण्यात यावा.त्यानुसार नियमित वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र बडगुजर, सचिव प्रदीप पाटील, उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका सरचिटणीस मधुकर चौधरी, मधुकर पाटील,सुदाम पाटील, धनराज बोरसे,बुधा गायकवाड,शेखर ठाकूर, अर्चना महाजन,प्रिया बडगुजर,वनिता पाटील,मिराबाई लोखंडे आदी उपस्थित होते.