जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत रा. ति. काबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

प्रतिनिधी – एरंडोल येथील रा. ति.काबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले असून त्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले.
अमळनेर येथे जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत 17 वर्ष आतील 52 किलो वजन गटात यामिनी भानुदास आरखे ही प्रथम आली तसेच 81 किलो वजन गटात भावेश भानुदास आरखे प्रथम आला. 14 वर्षे आतील 35 किलो वजन गटात मुकेश दिलीप सोनवणे तृतीय आला. 14 वर्षे आतील 50 किलो वजन गटात रोशन उमेश पाटील तृतीय आला. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक,प्रशिक्षक व पालक भानुदास आरखे,अनिल मराठे,ऋषिकेश महाजन तसेच दिलीप सोनवणे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी
शालेय समिती चेअरमन अनिल बिर्ला, सचिव राजीव मणियार, सहसचिव धीरज काबरे, न्यु इंग्लिश मिडीयम स्कुल चे चेअरमन डॉ. नितीन बिर्ला,सदस्य परेश बिर्ला,सतीश परदेशी,शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.राठी, उपमुख्याध्यापक पी.एच. नेटके ,पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.