वकील सहकाऱ्यावर झालेल्या मारहाण व तक्रार दाखल न करता गुन्हा दाखल केल्यामुळे नोंदविला संघाने निषेध.

प्रतिनिधी – एरंडोल येथील एरंडोल तालुका वकील संघातर्फे भुसावळ येथील अॅड. विवेक केशव आवारे यांना पक्षकारा कडून मारहाण, शिवीगाळ, धमक्या दिल्या तसेच यावेळी अॅड. विवेक आवारे भुसावळ येथील शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता तेथील पोलीस उपनिरीक्षक ढमाळे, यांनी वकीलांची तक्रार घेण्यास टाळा टाळ करून चुकीची वागणूक दिली व ॲड.आवारे यांच्या विरुध्द देखील खोटा गुन्हा दाखल केला.या निषेधार्थ एरंडोल वकील संघासह जिल्हाभरातून विविध तालुक्यातील वकील संघटनां कडून सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.त्या संदर्भात अँड. आवारे यांना न्याय मिळावा व पोलीस उपनिरीक्षक ढमाळे यांचे वर निलंबनाची कारवाई व्हावी त्या संदर्भात पोलीस अधिक्षक, जळगांव यांच्या कडे पत्र देण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
याप्रसंगी वकील संघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.