निपाणे शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत श्री संत हरिहर महाराज परिवर्तन पॅनला बहुमत

प्रतिनिधी एरंडोल — तालुक्यातील निपाणे शिक्षण प्रसारक मंडळाची अठरा वर्षांनंतर प्रथमच गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले .
यावेळी निपाणे शिक्षण प्रसारक मंडळाची त्रीवार्षीक निवडणूक आज दिनांक २८ रोजी घेण्यात आली एकुण २२६ मतदान होते त्यापैकी २११ मतदान झाले.
संध्याकाळी सहा नंतर निकाल जाहीर झाला यात नविन चेहर्यांना संधी देण्यात आली श्री संत हरिहर महाराज परिवर्तन पॅनला नऊ पैकी सहा जागा मिळवून दणदणीत विजय मिळविला त्यात अध्यक्ष म्हणून श्रीधर ताराचंद पाटील, उपाध्यक्ष सुधाकर शिवाजी पाटील, चिटणीस किशोर शिवाजी महाले व संचालक सुनिल प्रल्हाद पाटील, संदिप युवराज पाटील व सागर नगराज पाटील हे विजयी झाले.
यात जागृती पॅनलला सहा पैकी एकच जागेवर समाधान मानावे लागले यात दिलीप प्रकाश पाटील हे सरचिटणीस म्हणून विजयी झाले, तर श्री संत हरिहर महाराज पॅनल यांना आठ पैकी फक्त दोनच जागा मिळाल्या यात भुषण मदनलाल बियाणी व शरद पिरन ठाकूर हे संचालक विजयी झालेत
ही त्रीवार्षीक निवडणूक आठरा वर्षांनंतर प्रथमच गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले यात रथी महारथींचा पराभव झाला आहे.
श्री संत हरिहर महाराज परिवर्तन पॅनला नऊ पैकी सहा जागांवर दणदणीत विजय मिळविला या निवडणुकीत तीन मावळते संचालकांचा पराभव झाला आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन हे होते तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले यावेळी विजयी उमेदवारांची संपूर्ण गावात वाजतगाजत गुलाल उधळून मिरवणूक काढण्यात आली.