क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
२५ किलो गांजासह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद..

प्रतिनिधी जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेने सहस्त्रलिंग (ता. रावेर) येथे कारवाई करून २५ किलो गांजा जप्त करत एकाला अटक केली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ७० हजार रुपये आहे.
गोपनीय माहितीनुसार पो. उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकाने छापा टाकला असता, शेतात गांजाची लागवड आढळली. शेतमालक महेरबान रहेमान तडवी (वय ३२) यास ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशन येथे NDPS कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.