युवा उद्योजक ईश्वर भाऊ सोनार पंचायत समिती साठी इच्छुक

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील नावाजलेले युवा उद्योजक व समाजसेवक ईश्वर भाऊ सोनार यांनी येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
ईश्वर भाऊ सोनार हे गोरगरिबांचे खरे मित्र म्हणून ओळखले जातात. गरजू कुटुंबांना मदत करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देणे, तसेच आरोग्य आणि स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांची सततची धडपड आहे. कोणत्याही व्यक्तीवर संकट कोसळले की, ईश्वर भाऊ मदतीचा हात पुढे करतात.
त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे आणि लोकांशी असलेल्या जवळिकीमुळे आज एरंडोल परिसरातील तरुण वर्ग त्यांना एक आदर्श व प्रेरणास्थान मानतो. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले असून, स्थानिक उद्योगांना चालना देण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
ईश्वर भाऊ सोनार यांनी सांगितले की, “जनतेची सेवा हाच माझा धर्म आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून एरंडोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
त्यांच्या या निर्णयाचे स्थानिक नागरिक, युवकवर्ग आणि सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, एरंडोल तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ईश्वर भाऊ सोनार हे एक आशेचा किरण ठरत आहे