जळगावमहाराष्ट्र
राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून राजधर महाजन यांचा गौरव.

प्रतिनिधी – एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन यांचा “राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता” म्हणून सन्मान करण्यात आला.
पुणे येथील ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह यांचे तिसरे महाअधिवेशन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा, पुणे येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी पार पडले.
या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या हस्ते राजधर महाजन यांना
माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने काम केल्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या गौरवाबद्दल बोलताना राजधर महाजन म्हणाले, “हा सन्मान माझ्या कार्याला अधिक बळ देणारा आहे. पुढील काळातही समाजहितासाठी निस्वार्थपणे काम करत राहीन.”राजधर महाजन यांचे विविध माध्यमातून कौतुक व अभिनंदन होत आहे.