जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र
दिपक पाचपुते यांना राज्यस्तरीय सर्वोत्तम माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार.

प्रतिनिधी एरंडोल – पुणे येथे झालेल्या ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूहाच्या तिसऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी काझी येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक पाचपुते यांना “राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या अधिवेशनात विवेक वेलणकर, नामदेवराव जाधव, दिलीप फडके व विलास ठोसर यांनी मार्गदर्शन केले. माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे पारदर्शक शासनाची गरज अधोरेखित करण्यात आली. या कार्यक्रमामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.