कानबाई मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम .मरीमाता मंदिरात वही गायन करून लक्ष्मीपूजन आणि दिवाळी साजरी

प्रतिनिधी एरंडोल – सणासुदीच्या काळात सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा उपक्रम म्हणून कानबाई मित्र मंडळ यांच्या वतीने मरीमाता मंदिर परिसरात भव्य वही गायन, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली.

मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने देवीचे पूजन केले. त्यानंतर मंगल वाद्यांच्या गजरात वही गायन करण्यात आले. पारंपरिक स्तोत्रे, देवीची आरती आणि भक्तिगीतांनी परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमानंतर लक्ष्मीपूजनाचे विधिवत आयोजन करण्यात आले.
या वेळी मंडळाचे सदस्य श्री. भिका चौधरी, आधार महाजन, अजय महाजन, पंकज धनगर, तुषार चौधरी, चिंतामण चौधरी, अशोक चौधरी, दिलीप बडगुजर, भगवान पंचलोड, ईश्वर मराठे, आत्माराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे समाजात एकता, भक्तीभाव आणि सणांची परंपरा जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. उपस्थितांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील काळातही अशा सांस्कृतिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.