एरंडोल येथे आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना.
प्रतिनिधी एरंडोल:-गुरुवारी तिसऱ्या मजल्यावरील घरात महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची घटनेला तीन दिवस झाले तोच येथे नारायण नगर मध्ये लोखंडी जिन्याला दोर बांधून ४२ वर्षीय इसमाने रविवारी पहाटे आत्महत्या केल्याचे उघडीस झाले. मृताचे नाव समाधान नारायण पाटील असे आहे.
समाधान पाटील हा काली पिली गाडी चालवून त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. चार वर्षांपूर्वी समाधान पाटील हा अपघातात गंभीर जखमी झाला त्याच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यात त्याला इन्फेक्शन झाल्याने औषधोपचार करण्यासाठी त्याची पत्नी त्याना मुंबई येथे घेऊन गेली होती. त्यांना शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले होते मुंबई येथून ते दोघेजण खाजगी वाहनाने एरंडोल येथे रविवारी भल्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घरी पोहोचले. दीड तासानंतर समाधान नारायण पाटील याने त्यांच्या घराच्या समोर गॅलरीला असलेल्या लोखंडी जिन्याला दोर बांधून गळ्यात टाकून गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत राहुल रमेश पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.एरंडोल पोलीस पुढील तपास करीत आहेत.