जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

जवखेडेसिम येथे विविध विकासकामांचे भुमीपुजन-लोकार्पण सोहळा संपन्न..


प्रतिनिधी एरंडोल – तालूक्यातील जवखेडेसिम येथे मुलभुत सुविधेसह मंजुर विविध विकासकामांचा भव्य भुमीपुजन व लोकार्पण सोहळा नवनिर्वाचित आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्याहस्ते नुकताच संपन्न झाला.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अमोलदादा पाटील यांची मोठ्या मताधिक्याने एरंडोल विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सोहळा पार पडला. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले आणि कुटुंबातर्फे देखील सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी रवि जाधव, दादाजी पाटील,  अनिल महाजन,  किरण पाटील, बबलु पाटील,  कमलेश पाटील, कुणाल महाजन,  संजय पाटील, शरद ठाकुर, गौरव पाटील, गणेश पाटील, आरिफदादा, उत्राण अमोल महाजन, कुणाल पाटील यांचेसह जवखेडेसिम गावासह पंचक्रोशितील विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button