क्राईमजळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

नदी पात्रात अचानक धाड टाकून जप्त केले अवैध वाळू उपसा करण्याचे मशीन…..!


प्रतिनिधी एरंडोल – येथील तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या पथकाने २९ डिसेंबर २०२४ रोजी दौलतपुरा वस्ती येथे गिरणा नदी पात्रात अचानक पाहणी केली असता पाण्यातून अवैध वाळू उपसा करणारे यंत्र,तार, नायलॉन,दोर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.ग्रामस्थांच्या मदतीने अवैध वाळू उपसा करणाऱ्या मशीन सह इतर साधने तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले.तालुका महसूल यंत्रणेने अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी धडक मोहीम तीव्र करण्यात आल्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
        ही कारवाई करणाऱ्या पथकात तहसीलदार प्रदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार संजय घुले,उदय निंबाळकर,दिपक ठोंबरे, बालाजी लोंढे, वैभव पठे, रोहीत इंगळे, नितीन पाटील आदींचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button