सिध्देश्वर विद्यालयाच्या शिक्षिका छाया नामदेव पाटील सेवानिवृत्त….!

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील पिंपळकोठा बु.येथील सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका छाया नामदेव पाटील ह्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवेनिवृत्त झाल्या.नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डि.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सेवापुर्तीचा कार्यक्रम ४ जानेवारी २०२५ रोजी पार पडला.त्यांना भेटवस्तू,साडी,बुके व सरस्वतीची प्रतिमा देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.विशेष हे की छाया पाटील यांना बालपणीच पोलीओ झाल्यामुळे अपंगत्व आले होते.तसेच त्यांची कौटुंबिक स्थिती हलाखीची होती.या दोन्ही बाबींवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका झाल्या.
त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके घेण्यासाठी वेळोवेळी मदत केली.तसेच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला.विशेषकरून अपंग विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत केली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील तर सुत्रसंचलन के.डब्ल्यू.चौधरी यांनी केले.सुनील गरूड एस.आर.पाटील ,एम.के.मराठे ,आर.झेड.पाटील,आरूषी पाटील, नामदेव बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार प्रदर्शन प्रणाली पाटील यांनी केले.
यावेळी ईश्वर पाटील,देवेश पाटील,चंद्रसिंग पाटील, भय्यासाहेब पाटील,गोपाळ पाटील,संध्याताई महाजन, मुख्याध्यापक पी.एम.कोळी,अंजुषा चव्हाण,सानप, दुर्गाबाई पाटील, अरूण पाटील,लोटन पाटील, विनोद पाटील आदी उपस्थित होते.