शैक्षणिक

आमदार सत्यजित तांबे यांची एरंडोल तालुक्यातील १३ शाळांना ७पोडियम व ६ संगणक भेट.

प्रतिनिधी – एरंडोल येथे पदवीधर मतदारसंघ नाशिक विभागाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांची दि १३ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील १३ शाळांना भेट देऊन सन २०२४ -२०२५ च्या स्थानिक विकास निधी अंतर्गत एरंडोल तालुक्यातील १३ शाळांना ७ पोडीयम व ६ संगणक संच स्वतःच्या हस्ते उपस्थित राहून वितरीत केले.
या प्रसंगी तालुक्यातील जि.प.उर्दु मुलांची शाळा मुख्याध्यापक मजहर जनाब, डॉ.राजेंद्र देसले , टिडीएफ चे जेष्ठ पदाधिकारी तथा माजी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मुख्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष आर.टी.पाटील ,ग.स.सोसायटीचे अध्यक्ष व जि.प.काढोली शाळेचे मुख्याध्यापक अजबसिंग पाटील ,काबरे विदयालयाचे उप मुखा्ध्यापक नेटके, व्ही.टी.पाटील,तळई चे मुख्याध्यापक विजय पाटील,जळुचे मुख्याध्यापक के.व्ही अहिरराव, नंदलाल भावसार ,जि.प.पातरखेडे मुख्याध्यापक सतिश महाजन , बालशिवाजी शाळेचे शिक्षक बडगुजर ,भारती विदयामंदीर कासोदाचे पाटील ,श्रीकांत बिर्ला , उमेश वाघ ,उत्राण उर्दू हायस्कुलचे आते शेख ,कलिम शेख.सोपान महाजन ,राहुल महाजन एस.एन.पाटील (अमळनेर) गुंजाळ आदी मान्यवर व एरंडोल तालुक्यातील पोडीयम व संगणक प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर वृंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आमदार सत्यजित तांबे ओडियम व संगणक संच विक्रीत केलेल्या शाळांची नावे खालील प्रमाणे
पोडीयम प्राप्त शाळा. १)रा.ति.काबरे विदयालय एरंडोल
२) भारती विदयामंदीर कासोदा
३) तळई माध्यमिक विदयालय तळई
४) ध.ख.पाटील माध्य.वि.आडगांव
५)सरस्वती माध्य.वि.विखरण
६) प्रियदर्शनी माध्य.वि.जळू
७)माध्यमिक विदयालय खर्ची (बु)
संगणक प्राप्त शाळा-
१) जि.प.शाळा (उर्दू मुलांची) एरंडोल
२) बालशिवाजी प्राथ.विदयामंदीर एरंडोल
३) जि.प.शाळा कढोली
४) जि.प.शाळा पातरखेडे
५) हाजी मिया देशमुख उर्दू हायस्कुल उत्राण
६) लिटील व्हँली स्कुल कासोदा..
आमदारांनी ओडियम व संगणक संच तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांना आपल्या निधीतून उपलब्ध करून दिल्याबददल एरंडोल तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान एरंडोल येथील बाळासाहेब देशमुख यांची एमबीबीएस ला असणारी कन्या ही गेल्या चार दिवसा अगोदर मृत्यू झाल्याचे समजल्याने आमदार तांबे यांनी त्यांच्या एरंडोल येथील लक्ष्मी नगर निवासस्थानी भेट देऊन पालकांचे सांत्वन केले.यावेळी राजेंद्र शिंदे, डॉ.राजेंद्र देसले,माजी नगरसेवक अतुल पाटील,ॲड.अरुण देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button