एरंडोल तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान….!

प्रतिनिधी एरंडोल – येथे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे स्थानिक पत्रकारांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन ९ जानेवारी २०२५ रोजी गुरूवारी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते.विशेष अतिथी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता तालुकाध्यक्ष पंकज पाटील पाचोरा व माहिती अधिकार एरंडोल तालुका अध्यक्ष सिताराम मराठे काशिनाथ सपकाळे जळगाव,गुणवंतराव सोनवणे यांची उपस्थिती होती.



ॲड.मोहन बी.शुक्ला, माजी तहसीलदार अरूण माळी, सामाजिक कार्यकर्ता कृष्णा सोनार, जेष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव, आल्हाद जोशी या मान्यवरांचा स्वागत व सत्कार फेडरेशनचे आधारस्तंभ तथा प्रमुख पदाधिकारी राजधर महाजन यांनी केले.


कैलास महाजन,शैलेश चौधरी,पंकज महाजन,कुंदन ठाकूर, दिपक बाविस्कर,प्रमोद चौधरी,प्रविण महाजन,उमेश महाजन,स्वप्निल बोरसे, दिनेश चव्हाण,कमर अली सय्यद,जावेद मुजावर,रतिलाल पाटील, संजय चौधरी, सुधीर शिरसाट,प्रकाश शिरोळे या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.



प्रास्ताविक भरत महाले यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन ठक्कर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजधर महाजन, नितीन ठक्कर, तुषार शिंपी,संभाजी पाटील, प्रा.आर.एस.निकुंभ, अरूण पाटील, मधुकर महाजन, अनंत सोनवणे, जगदीश पवार, राहुल महाजन, विज्ञान पाटील,भरत महाले, सोपान माळी, अरूण नेटके, प्रभाकर महाजन, सुनील महाजन यांनी परिश्रम घेतले.