एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे राज्य मार्गावर आठवडे बाजार भरू न देण्याचे आदेश….
प्रतिनिधी – एरंडोल शहर पोलीस स्टेशन तर्फे तालुका तसेच सर्व व्यावसायिक व नागरिकांना एरंडोल शहरातील दर रविवारी आठवडे बाजार मरीमाता मंदीर ते नथ्थु बापु दर्गा, नवीन आठवडे बाजार ओट्याजवळ, म्हसावद नाका ते अंजनी नदी पात्रात भरतो. मात्र मागील काही महिन्यांपासून, हा बाजार एरंडोल- नेरी राज्यमार्गावर धरणगाव चौफुली ते म्हसावद नाका दरम्यान भरत असल्याचे आढळून आल्याने एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या आदेशान्वये सदर बाजार या ठिकाणी भरू नये अशी सूचना करण्यात आली आहे.
सदर राज्यमार्ग मुख्य रहदारीचा असून येथे मोठ्या प्रमाणावर अवजड व लहान वाहने ये-जा करतात. राज्यमार्गावरील वाहतूक अडवणे किंवा वळवणे शक्य नाही.
बाजारातील गर्दीमुळे रोड अरुंद होत असून, गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे एरंडोल पोलीस निरीक्षक तथा एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे व्यापारी व विक्रेत्यांसाठी धरणगाव चौफुली ते म्हसावद नाका राज्यमार्गावर कोणीही बाजारासाठी दुकान, लोटगाडी किंवा कोणताही व्यवसाय करू नये. अशी सूचना करण्यात आली असून राज्यमार्गावर बाजार भरल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येण्याची देखील सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान याबाबतीत अनेक वेळा वृत्तपत्रातून तसेच नागरिकांकडून नगरपालिकेस निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारे सदर दुकानांवर कारवाई होत नव्हती परंतु नूतन पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे शहरातील तथा परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे व जाणकारांच्या मते सदर काम नगरपालिकेचे असताना सुद्धा त्यांनी वेळेवर कुठलीही कारवाई केली नाही परंतु नूतन अधिकारी यांनी वेळीच दखल घेऊन शहराला भेडसावत असलेली समस्या दूर करण्याचे प्रयत्न करीत आहे.