जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र
एरंडोल येथील आरोग्य दूत विकी खोकरे यांना मानाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी एरंडोल;-येथील आरोग्य दूत विकी खोकरे यांनी उल्लेखनीय आरोग्य सेवा दिल्याबद्दल त्यांचा पुणे येथे सामाजिक राष्ट्रीय युवा संमेलनात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (बिग बॉस फ्रेम) व मराठी सिने अभिनेते ध्रुव दातार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. विकी खोकरे यांना आतापर्यंत त्यांच्या आरोग्य सेवेबद्दल व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक संस्थांतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे एरंडोलकरांची शान व मान उंचावली आहे. . विकी खोकरे मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.