एरंडोल येथे होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी– एरंडोल येथील पोलिस ग्राउंड वर दिनांक ११ नोव्हेंबर रोजी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गृहरक्षक दलाची स्थापना दिनांक ६ डिसेंबर १९४६ रोजी करण्यात आली होती आता स्थापना होऊन ७७ वर्षे पूर्ण झाल्याने एरंडोल गृह रक्ष दलातर्फे ७८वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने अशोक नखाते जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांचा आदेशानुसार पथकातील तालुका समादेशक अधिकारी प्रवीण ढाकणे यांच्या मार्गदर्शना खाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी वरिष्ठ पलटण नायक दिनेश पाटील,पलटण नायक रमजान दैवते, गुलाब चौधरी, अ. लिपीक गोविंद साळी व सर्व पुरुष व महिला होमगार्ड यांनी परिश्रम घेतले. यासाठी पोलिस निरीक्षक गोराडे, साहेब सहायक पोलिस निरीक्षक पवार साहेब यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी पोलिस ग्राउंड येथे स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली तसेच एरंडोल शहरात तहसील कार्यालय, बुधवार दरवाजा , छ. शिवाजी महाराज पुतळा, भगवा चौक, अमळनेर दरवाजा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाफुले, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या मार्गे मोटर सायकल रॅली काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाफुले, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना
माल्यार्पण करण्यात आले. होमगार्ड जवानांना त्यांचे कर्तव्य व उद्देश विमोचन, अग्निशमन, बचावकार्य, आणि संघटने बाबत माहिती देण्यात आली. शहरातील नागरीकान कडून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.