क्राईमजळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

लाचलुचपत विभागाची महावितरणला शॉक म्हणजे, महावितरणच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक..

विशेष प्रतिनिधी  – दि २२ जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सापळा रचून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी नवीन सर्विस कनेक्शनच्या क्षमता वाढसाठी २० हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कंपनी मर्या. (चोरवड) भुसावळ असे त्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असुन त्यांनी एका खाजगी कंपनीचा NSC या स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ १००वॅट हून २०० वॅट करण्याकरीताचा प्रस्ताव प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता यांचे कडे कार्यकारी अभियंता याना पाठविण्यासाठी प्रलंबित होता. सदरचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, भुसावळ यांचेकडे पाठविण्यासाठी प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. म्हणून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता यांनी प्रथम २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करुन दि. २२ रोजी लाचेची २० हजार रुपये रक्कम स्वीकारली म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कारवाई एलसीबी चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पो. बाळू मराठे, पो. अमोल सुर्यवंशी यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button